मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते.
माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ -श्री संत ज्ञानेश्वर.
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

१५ डिसें, २००८
२० डिसें, २००७
रामगढ के शोले:
रामगढ के शोले:
'शोले' चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड आहे . भारतीय जनामानसावर या चित्रपटाचा असलेला पगडा लक्षात घेऊन यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात 'शोले' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. याचा एक फायदा म्हणजे 'शोले' सर्वांनी इतक्या वेळा पाहीला आहे की पाठ्यपुस्तकाची गरजच नाही. आणि परीक्षेच्या काळात भाड्याने CD उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. तेव्हा आता काम उरले एकच. प्रश्नपत्रिका काढणे . आणि मंडळाने सर्वानुमते 'शोले' चित्रपटाचे जाणते अभ्यासक श्री श्री अभिजित यादव यांच्याकडे सोपवले आहे. तर अशी असेल प्रश्नपत्रिका.........
-------------------------------------------------------------------------------
सूचना :
१. एकूण ८ प्रश्न असतील. (आदमी १ और प्रश्न ८!!)
२. सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल.
प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा ....(१५ हजार)
* धन्नोची स्वामीनीनिष्ठा
* खरा नायक कोण : जय की विरू?
* मी गब्बर असतो तर?
* रामगढचे निसर्गसौंदर्य
प्रश्न २ : खालीलपैकी २ प्रश्नांची उत्तरे २ ते ३ पाने लिहा......(१० हजार)
* ठाकूर बल्देव सिंग आणि डाकू गब्बर सिंग यांच्यातील दुश्मनीची कारणे सांगा. तसेच ठाकूरने गब्बरला पकडण्यासाठी जय आणि विरू यांचीच निवड का केली?
* गब्बरने रामगढच्या वासीयांवर केलेले अत्याचार तुमच्या शब्दांत सांगा.
* जयने विरूसाठी केलेला त्याग उदा: दोन्ही बाजूला समान छाप असलेल्या नाण्याचा वापर आणि जय- विरूची दोस्ती यावर चित्रपटाएवढे प्रदीर्घ उत्तर लिहा.
* विरू आणि बसंतीची प्रेमकहाणी.
प्रश्न ३ : टीपा लिहा. शब्दमर्यादा- रेल्वे स्थानकापासून ते रामगढपर्यंत बसंतीने जितक्यावेळा "यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही " म्हटले आहे तितकी.....................................................(८ हजार)
* सूरमा भोपाली आणि जेलर यांचे विनोद .
* विरूचे मद्यप्राशन करून जलकुंभारोहण.
* रामलाल: एक आदर्श निष्ठावंत.
* होळी उत्सवातील नाट्यमय घडामोडी.
प्रश्न ४ : एका वाक्यात उत्तरे द्या ..................................(२ हजार)
* जय नेहमी कोणते वाद्य वाजवत असे ?
* बसंती चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्या देवाची प्रार्थना करत असे?
* जय-विरूला पकडून देण्यासाठी सरकारने किती इनाम लावले होते?
* अहमद-इमामचा मुलगा नोकरीसाठी कोणत्या गावी जात असतो? (ही हा हा कसं वाटतंय पेपर सोडवताना )
प्रश्न ५: गाळलेल्या जागा भरा. .....................................(६ हजार)
*ये हात मुझे दे दे................. . (टीप: नीट विचार करा. हात देण्याआधी नव्हे. उत्तर लिहिण्याआधी)
*तुम्हारा नाम क्या है......................?
*तेरा क्या होगा ,....................?
*अरे ओ ........... कितना इनाम रखे है रे सर्कार हमपे?
*चल ......... आज तेरी ........... की इज्जत का सवाल है। (टीप : दोन गाळलेल्या जागा आहेत. दोन उत्तरे आहेत. दोघींच्या इज्जतीचा सवाल होता. त्यामुळे फ़क्त दोन उत्तरे ओळखली तरी पूर्ण गुण मिळतील.)
प्रश्न ६ : कोण कोणास म्हणाले ते लिहा. ..........................(३ हजार)
* इतना सन्नाटा क्यूं है भाई?
* लोहा गरम है मार दो हथोडा।
* यूं तो १० -२० को तो हम भारी पड ही सकते है।
* सूंअर के बच्चो।
* हमारी जेल मे सुरंग???
* पहली बार सुना है ये नाम।
प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. ...............(४ हजार)
* गब्बरला पकडण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात द्यायची आहे. त्याचा मसुदा तयार करा. ( शब्दमर्यादा: इनामाची रक्कम /१०००)
* गावकऱ्यांना धमकावण्यासाठी गब्बरला एक पत्र/चिठ्ठी तयार करून द्या .
प्रश्न ८: समजा रामगोपालवर्मा ऎवजी तुम्हाला शोले चा रिमेक बनवायची संधी दिली आहे . त्या अनुषंगाने खालील प्रश्नांची उत्तरे द्या. उत्तरे चांगली असतील तर सरदार साबासी देगा...................................( ५ हजार)
* बसंतीच्या घोड्याचे/घोडीचे नाव काय ठेवाल?
* रामलालला ५व्या वेतन आयोगानुसार बढती/पगारवाढ द्याल काय?
* विरूला पाण्याच्या टाकीऎवजी कुठे चढवाल?
* जयला बनावट नाणी वापरल्याबद्दल जेलमध्ये टाकाल काय?
*हा प्रश्न तुमच्यासाठी राखीव, तुमच्या निर्मितीक्षमतेसाठी. काहीही उत्तर द्या

२६ फेब्रु, २००७
काचेची बरणी व २ कप चहा
(आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.
पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."
सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते"

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)