१९ डिसें, २००७

मित्रा ! नातं तुझं नि माझं

मित्रा ! नातं तुझं नि माझं,
.....असंच राहू दे.

वाळवंट जरी मी,
.....नंदनवन फुलवून घे.

हृदय शुष्क जरी माझे,
.....मनीं आनंद पाझरु दे.

चुकलो मित्रा जरी मी,
.....बरोबर तू करुन घे.

दुःख जरी दिले मी,
.....सुख तू मानून घे.

निरपेक्ष जरी मी,
.....अपेक्षा तू राहू दे.

ध्यानी जरी नसे मी,
.....मनात तव असू दे.

दूरदेशी असलो जरी,
.....जवळीक तू असू दे.

तुचि माझा सखा, हा
.....सदा भाव राहू दे.

नयनातून माझिया ,
.....तव प्रेम ओघळू दे.

मित्रा ! नातं तुझं नि माझं,
.....असंच राहू दे.