(चाल: हीची चाल तुरूतुरू..)
ही चाल धप्प धप्प
होई धरणीचा कंप
काही घरेही ढासळली
कशी केरळच्या वनात
मनातल्या मनात
हत्तीण घाबरली
जिलब्यांची रिचवून रास ना
लाडवांचे घेऊन घास ना
बासुंदी पुरी चाप ना
कितीका वाढे मग माप ना
तू दणदण जाता,
भार येइना पेलता,
भुई पावलांनी हादरली..
कशी केरळच्या वनात,
मनातल्या मनात,
हत्तीण घाबरली..
फुकाच पिझ्झा हाणून,
उगाच देशील ताणून
उदर भरवून भातानं,
गहु तुला लागती पोत्यानं
हा टेप ही पुरेना,
वजनकाटा ही हलेना,
रणगाड्याचीही मस्ती जिरली..
कशी केरळच्या वनात,
मनातल्या मनात,
हत्तीण घाबरली..