तुला मनसोक्त हसताना पहायचंय
निदान त्यासाठी तरी मला विदूषक बनुन तुझ्यासमोर यायचय
तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचय ,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास बसायचय.
तुझ्या मऊ केसांवरुन हळुवार हात फ़िरवायचाय ,
निदान त्यासाठी तरी एक गजरा तुज़्या केसात माळायचाय ,
तुला माझ्यासाठी बेचैन होताना पहायचय,
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेच्या ऊशिरा यायचय.
तुला अनिवार रडतना पहायचय,
निदान त्यासाठी तरी मला खोट खोट मरायचय.