२६ फेब्रु, २००७

सांग मला..

(आपल्याच माणसासी झालेल्या विवादानंतर कधी कधी आपण एकमेकाशी बोलणे बंद करतो. आणि मगं एकाला मागार घेऊन म्हणावे लागते-

सांग मला.. सांग मला..
माझ्याशी तू तुझ्याशी मी
काहिच नाही बोलायचे।
रक्ताचे नाते तुटणार नाही
असे फक्त तू मज म्हणायचे।
सांग मला, मी आता
कसे कसे जगायचे॥

जगताना ही मरताना ही
नाही तुझ्याशी बोलायचे।
हे मी आता काय गं
तुझ्याविनाच भटकायचे।
सांग मला,मी मगं आता
कुणा कुणा भेटायचे॥

कुणा कुणाशी मी
काय काय बोलायचे।
हे तुच काय ते
माझ्यासाठी ठरवायचे।
सांग मला, मगं मी आता
कोणाशी काय बोलायचे॥

चुकले सारे माझे आता
हे मीच मला म्हणायचे।
हे सांगयाला पण तुझ्याशी
नाही मी बोलायचे।
सांग मला,तुची आता हे
मी तुलाकसे कसे सांगायचे.

सांग मला..
सांग मला...
सांग मला....
-सुरेश.