१७ ऑक्टो, २००७

तू माझी अन्...

तू माझी अन्...

तू माझी अन् मी तुझा रे,
ही भावनाच वेगळी
घोर जिवाला लावू नको रे,
तू माजी सावली १
तू माझी अन्...

दुसरे काहि ठावुक नाही,
मन हे माझे असे
काय कुणाला माहित नाहि,
घडले सारे कसे? २
तू माझी अन्...

समजून मजला तुच घे रे,
तुजला मी घेईल
मनास तुझ्या समजून दे रे,
तुझाच मी राहील ३

सोडून मजला जावू नको रे,
जरी चुक कही घडली
तू माझी अन् मी तुझा रे,
ही भावनाच वेगळी ४
तू माझी अन् मी तुझा रे,
ही भावनाच वेगळी...